Posts

जीवनाचे सत्य !

Image
नमस्कार ! सर्वांचे स्वागत आहे या ब्लॉग मध्ये , आज मी एका गंभीर विषयावर लिहणार आहे, विषय गंभीर आहे म्हणून तुम्ही गंभीर होऊ नका..!! 😛 हसत खेळत मस्त आयुष्य जगा, कारण आयुष्य एकदाच आहे. चला तर करुया सुरुवात आजच्या लेखनाला...! "एक किस्सा सांगतो , " माझा एक मित्र होता , आयुष्याला खूप सिरियस घेणारा ! लवकर सुखाचे जीवन जगावे म्हणून दिवस रात्र एक करणारा...घाईत लग्न झाले , त्याचे पाहून त्याची पत्नी देखील त्याच पद्धतीने सुखाचा संसार व्हावा म्हणून धडपड करणारी , मुल जन्माला आले, ते देखील पप्पा मम्मी सारखे !  " आयुष्याला सिरियस घेणारे !!! "  होता होता एक दिवस असा आला घरातील सर्वच मंडळी सुखाने जगावे म्हणून धडपड करू लागली... घरात असे तणावाचे वातावरण झाले की त्या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलले ते म्हणजे " मरण " !!!! मला विचार पडला काय असते ओ " सुख " !!! प्रत्येक जण सुखासाठी धडपडत आहे.त्यातच आयुष्य निघून चालले आहे , आणि एक दिवस सुखाने नाही तर दुःखाने मरत आहे ...!! पायी चालणाऱ्याला वाटते सायकल तरी हवी, सायकल ज्या कडे आहे त्याला वाटते एखादी दोन च...

जीवन एकदाच तर आहे , जगून बघा एकदा...

Image
जगून पहा एकदातरी  !! पुण्यातला किस्सा सांगतो,  सिग्नल ला गाडी उभी होती, मी ड्राइव्ह करत होतो, तितक्यात एक छोटी मुलगी येऊन काच वाजवायला लागली, मी सुट्टे एक दोन रुपये दिले, मला बरे वाटते,पण तितक्यात कडेवर छोट बाळ घेऊन एकबाई आली , आणि त्या मुलीने ते पैसे तिच्या कडे दिले...मी बारकाईने लक्ष देत होतो,तर एक सिग्नल च्या एका बाजूला त्यांचे बरेच लोक दिसले...त्यांची टोळीच आहे हे लक्षात आले ...  हा किस्सा , पण एक गोष्टीचे वाईट वाटले ,काय जगत आहे हे ... जीवन एकदाच आहे ,जगून पहा ओ... असे काही लोक मी पाहिले की ,जीवन असे जगतात की कधीच मरणार नाहीत ..कुठल्या गोष्टीचा घमंड असतो काय माहिती...जो तो आपल्या पद्धतीने जगत असतो, पण जगत असताना असे तरी जगू नका की कधीच मरणार नाहीत. हे तर नक्की की ती मुलगी त्या बाईची नसेल , गरजू अनाथ , अपंग यांच्या कडून भिक मागितली जाते, त्यावर ते जगतात.   बापरे !!!  कसे अन्न गोड लागत असेल ,माहिती नाही ... असो , सांगायचं काय तर जीवन एकदाच आहे जगून तर पहा.    जीवनात पैसा असो किंवा नसो , प्रत्येक गोष्टीत आनंद शोधत आला पाहिजे, ज्याला ...