जीवन एकदाच तर आहे , जगून बघा एकदा...
पुण्यातला किस्सा सांगतो,
सिग्नल ला गाडी उभी होती, मी ड्राइव्ह करत होतो, तितक्यात एक छोटी मुलगी येऊन काच वाजवायला लागली, मी सुट्टे एक दोन रुपये दिले, मला बरे वाटते,पण तितक्यात कडेवर छोट बाळ घेऊन एकबाई आली , आणि त्या मुलीने ते पैसे तिच्या कडे दिले...मी बारकाईने लक्ष देत होतो,तर एक सिग्नल च्या एका बाजूला त्यांचे बरेच लोक दिसले...त्यांची टोळीच आहे हे लक्षात आले ...
हा किस्सा , पण एक गोष्टीचे वाईट वाटले ,काय जगत आहे हे ... जीवन एकदाच आहे ,जगून पहा ओ...
असे काही लोक मी पाहिले की ,जीवन असे जगतात की कधीच मरणार नाहीत ..कुठल्या गोष्टीचा घमंड असतो काय माहिती...जो तो आपल्या पद्धतीने जगत असतो, पण जगत असताना असे तरी जगू नका की कधीच मरणार नाहीत.
हे तर नक्की की ती मुलगी त्या बाईची नसेल , गरजू अनाथ , अपंग यांच्या कडून भिक मागितली जाते, त्यावर ते जगतात. बापरे !!! कसे अन्न गोड लागत असेल ,माहिती नाही ... असो , सांगायचं काय तर जीवन एकदाच आहे जगून तर पहा.
जीवनात पैसा असो किंवा नसो , प्रत्येक गोष्टीत आनंद शोधत आला पाहिजे, ज्याला हे जमल, त्याला जीवन जगता आल .
आमचे नाशिक चे मित्र रवी दादा नेहमी एक वाक्य बोलतात , जीवनात परिस्थिती कशी असो, त्या परिस्थितीचा आनंद घ्या, भले ती परिस्थिती आपल्या विरोधात असो, तो क्षण निघून जाणार आहे ..जर क्षण निघून जाणारच आहे ,तर तो क्षण एन्जॉय करा.
आता पुन्हा तो पुण्याचा किस्सा , ती मुलगी पैसे मागत होती पण त्यात तिच्या चेहऱ्यावर हसू होते , कारण ती तो क्षण एन्जॉय करत होती ,आणि जी बाई पैसे घेत होती ती मात्र दुःखात होती , परिस्थिती कशी असो , आनंदाने जगता आले पाहिजे.
आयुष्य -
पहिले २० वर्ष शिक्षणात निघून जातात.
पुढील १० वर्ष स्थिर होण्यात , पुढील १० वर्ष पैसे कमवण्यात ...काय शिल्लक राहिले...??
तुम्ही म्हणाल यालाच तर आयुष्य म्हणतात, नाही मित्रानो याला म्हणतात "जीवनात आला आणि हेलपाटे मारून गेला"
प्रत्येक क्षण निघून जाणार आहे, आणि आपण पण निघून जाणार आहोत ,हे ज्याला खोलवर समजले तो खरा आयुष्य जगला.
धन्यवाद ! !
🖊️
SHRIMANT MAGAR
PDT
AHMEDNAGAR
Comments
Post a Comment