जीवनाचे सत्य !
नमस्कार !
सर्वांचे स्वागत आहे या ब्लॉग मध्ये , आज मी एका गंभीर विषयावर लिहणार आहे, विषय गंभीर आहे म्हणून तुम्ही गंभीर होऊ नका..!! 😛
हसत खेळत मस्त आयुष्य जगा, कारण आयुष्य एकदाच आहे. चला तर करुया सुरुवात आजच्या लेखनाला...!
"एक किस्सा सांगतो , " माझा एक मित्र होता , आयुष्याला खूप सिरियस घेणारा ! लवकर सुखाचे जीवन जगावे म्हणून दिवस रात्र एक करणारा...घाईत लग्न झाले , त्याचे पाहून त्याची पत्नी देखील त्याच पद्धतीने सुखाचा संसार व्हावा म्हणून धडपड करणारी , मुल जन्माला आले, ते देखील पप्पा मम्मी सारखे !
" आयुष्याला सिरियस घेणारे !!! " होता होता एक दिवस असा आला घरातील सर्वच मंडळी सुखाने जगावे म्हणून धडपड करू लागली... घरात असे तणावाचे वातावरण झाले की त्या कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलले ते म्हणजे " मरण " !!!!
मला विचार पडला काय असते ओ " सुख " !!!
प्रत्येक जण सुखासाठी धडपडत आहे.त्यातच आयुष्य निघून चालले आहे , आणि एक दिवस सुखाने नाही तर दुःखाने मरत आहे ...!! पायी चालणाऱ्याला वाटते सायकल तरी हवी, सायकल ज्या कडे आहे त्याला वाटते एखादी दोन चाकी हवी, दोन चाकी वाला ,चार चाकी साठी धडपड करत आहे , चार चाकी वाला विमान घ्यायचं म्हणून धडपड करत आहे, सांगायचं काय तर प्रत्येक जण आयुष्यात धडपड करत आहे ते या साठी की "सुख" मिळावे...पण ते तर कुणालाच मिळत नाहीये...
"सुख म्हणजे काय ते मी सांगतो , आहे त्या परिस्थिती मध्ये समाधानी जो आहे तो सुखी आहे..आणि तेच लोक मोठ्या मनाचे बनतात , त्यांच्या सहवासात इतरांना आनंद मिळतो ,कारण त्यांना आयुष्य जगायला वेळ मिळतो... ते प्रत्येक कामाचा आनंद घेतात , आयुष्य असे जगतात एक दिवस आपल्याला जायचे आहे तर ते चांगल्या आठवणी जमा करून ठेवतात...!!
तुम्ही बोलणार इतकं सोप्पं आहे का ...किती कामाचे टेंशन असते , घर चालवणे सोप्पं आहे का ...? आयुष्यात असेच खाली हात राहायचे का...? तुमचे सर्व मान्य आहे , पण मग हे देखील सत्य आहे की एक दिवस आपल्याला जायचे आहे,तर मग प्रत्येक दिवस सुख मिळावे म्हणून जगलात तर सुखाचा आनंद घेणार केव्हा...???
येणारा दिवस जाणार आहे आणि गेलेला दिवस पुन्हा येणार नाही ,जो क्षण निघून जात आहे तो क्षण पुन्हा येणार नाही .. !
आयुष्यात आलात तर आठवणी जमा करा , अशा आठवणी ज्या आठवून आयुष्यात कसली खंत राहणार नाही...!
इतके का सिरियस झालात 😄 चला जो समोर दिसतोय, तो कोणी असो त्याला विचारा " काय रे तू सुखात आहेस का...? तर तो " हो " म्हणेल पण अजून एक प्रश्न विचारा, समाधानी आहेस का...मग तो आयुष्याची कहाणी सांगायला सुरवात करेल... " घरात हे टेंशन , कामात ते टेंशन , याचे हे त्याचे ते .... !!!
जगा पण असे जगा की जगण्याची मजा घ्या... !
चांगल्या आठवणी जमा करा त्याच शेवटी साथ देतात !
आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढेच...!!
🖊️
SHRIMANT MAGAR
PDT
AHMEDNAGAR
Comments
Post a Comment